
ढाणकी प्रतिनिधी ( प्रवीण जोशी)
भगवान महावीरांनी जगाला शांततेचा अमूल्य ठेवा दिला “अहिंसा परम धर्मो” ही ब्रीदवाक्याची जान आणि व्याख्या बिंबवली पर्युषण पर्व हे जैन धर्मातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते. भाद्रपद त्रयोदशी ला या पर्वाची सुरुवात होते यालाच पर्वराज किंवा महापर्व असे म्हटले जाते संबोधल्या जाते. पर्युषण म्हणजे मनातील सर्व विकारांचे शमन करणे काम क्रोध लोभ वयमनस्य या विकारापासून दूर राहून स्वतः शांती प्राप्त करून घेणे असे या व्रताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेष म्हणजे या व्रताच्या काळात पाच नियमांचे पालन प्रामुख्याने केले जाते त्यात अहिंसा सत्य असतेय अपरिग्रह ब्रह्मचर्य असे पाच दिवस पाळले जाते. अनंत चतुर्दशी या दिवशी या पर्वाची सांगता होते हे आठ दिवसात लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण पर्व उपासना करतात ज्यांना या आठ दिवसात उपवास करणे शक्य असते निरंकार विनाअनाचे उपवास करतात फक्त गरम पाणी पिऊन ते पण दिवस उगवल्यापासून ते अस्तमान होईपर्यंत पाणी प्यावे लागतं तर काहीजण एक दिवसाआड एक वेळ सकाळचे जेवण करून उपवास करतात.
या आठ दिवसात होईल तेवढे जास्त सर्वजण धर्म आराधना करतात या व्रताच्या अखेरच्या दिवसाला संवत्सरी असे म्हणतात क्षमा हे वीरांचे भूषण आहे असे भगवान महावीरांनी उपदेशात सांगितले आहे. त्याला अनुसरून या पर्वाच्या सांगतेत उपासकाने सर्वांची क्षमा मागणे याला व्रतात विशेष महत्त्व दिले गेले आहे क्षमा ही सर्व पापांना दूर करून मोक्षाचा मार्ग दाखविते. असा सारासार विचार यामागे आहे क्षमा विरस्य भूषण “जियो और जीने दो” हे सत्य आहे माझ्याकडून जर या पर्वात कोणाचे मन दुखावले असेल त्रास झाला असेल तर मी हात जोडून माफी मागतो असे सुद्धा एकमेकांना म्हणले जाते असे यावेळी किशोरचंद भंडारी यांनी सांगितले.
