विठाळा येथील तरुणाची अग्निशमन दलात निवड,बिकट परिस्थिती वर मात करीत मिळविले यश

दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण

ग्रामीण भागातुन अभ्यासात सातत्य नेहमीचे सरवाचे नियोजन व स्वतःच्या झिद्द आणि मेहनीतीच्या बळवर एका शेतकरी च्या मुलाची अग्निशमन दलात निवड झाली आहे. विठाळा येथील शेतकरी परिवारात जन्मलेल्या विकी कुमार रुईदास चव्हाण या तरुणाने अग्निशमक विभागा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र तुन 14 वा तर ज़िल्हा व तालुक्यातून प्रथम येऊन मुंबई येथील अग्निशमक दलात निवड झाली असून त्याच्या या निवडीने सर्व स्तरातून त्याच्या वर कौतुका चा वर्षाव होत आहे त्याने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना दिले आहे