बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका येथे वन महोत्सव व शाळा प्रवेशोत्सव संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक १जुलै २०२४ला शाळेत “वन महोत्सव दिवस” तसेच “शाळाप्रवेशोस्तव” शाळेचे मुख्याध्यापक उत्तम येपारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम शाळेतील जेष्ठ शिक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना प्रभारी शंकर मोहुर्ले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी वन महोत्सवाचे महत्त्व आणि पर्यावरणाविषयी, प्रत्येक नागरिकाला जागृत होण्याची गरज यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शंकर मोहुर्ले यांनी केले.शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या स्वागताचे व त्यांचे तोंड गोड करुन संपन्न झाला वर्ग ६वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापक श्री उत्तम येपारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक प्रवीण निमट, विनोद सातारकर, निलेश कोल्हे, मधुकर परचाके, शिक्षकेत्तर कर्मचारी विलास खेडेकर, विठ्ठल झाडे, शिपाई गजानन कुटे, गणेश गाडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर परचाके यांनी केले तरआभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक संजीव मडावी यांनी केले.