कुही शहरात विविध कामांचा भूमिपूजन

आमदार राजूभाऊ पारवे यांच्या हस्ते कुही शहरात 5 कोटी 38 लक्ष रुपयाचे नविन नगरपंचायत इमारत, नाली बांधकाम, सिमेंट रस्ता, cctv कॅमेरा, सभामंडप, वॉल कंपाउंडचे भूमिपूजन करण्यात आले.


उमरेड प्रतिनिधी (संजय अतकरी):-

दिनांक 12/09/2022 रोज सोमवारला कुही येथे अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना व वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजने अंतर्गत 5 कोटी 38 लक्ष रुपयाचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये नवीन नगरपंचायत इमारत, नाली बांधकाम, सिमेंट रस्ता, cctv कॅमेरा, सभा मंडप, वॉल कंपाउंडचे बांधकाम करण्यात येणार आहे.
तसेच नागरिकांचा समस्या जाणून घेतल्या व उर्वरित कामाचे प्रस्ताव करण्यात आले….

यावेळी नगराध्यक्षा हर्षा इंदोरकर, उपाध्यक्ष अमित ठवकर, मुख्याधिकारी सुषमा मांडगे, बांधकाम सभापती जयश्री धांडे, सभापती पाणी पुरवठा वैशाली सोमनाथे, उपसभापती महिला बालकल्याण शीतल येळणे, नगरसेवक महादेव जीभकाटे, विलास राघोर्ते, शारदा दुधपचारे, निशा घुमरे, रुपेश मेश्राम, सरिनकुमार शंभरकर, मयूर तळेकर, विनोद हरडे, सुषमा देशमुख, विद्या लेंडे, निखिल येळणे, वर्षा धनजोडे, नेहा मनसरे, तसेच गणेश दूधपचारे, दुर्गेश हजारे, देविदास ठवकर, सचिन घुमरे, सुरेश गुरनुले, सुरज देशमुख, अंकित थोटे तसेच संबधित विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.