
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील ग्रामपंचायतचे गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड विरोधी पक्ष सदस्याकडून होत आहे. सविस्तर वृत्त असे वाढोणा बाजार हे गाव विकासापासून कोसो दूर असल्याची ओरड गावातील शेतकरी शेतमजूर यांच्याकडून होताना दिसत आहे सदर गावातील रोड नाली नाली वरील रपटे अनेक दिवसापासून नीकामी होऊन आहे शेतकऱ्यांना नालीवरून बैल बंदी नेते वेळी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे अनेकदा शेतकऱ्यांची बैलबंडी नाली मध्ये फसली आहे याबाबत ग्रामपंचायतला वेळोवेळी लेखी तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. तर सरपंच सचिव यांचा मनमानी कारभार चालू असल्याचे येथील जनतेकडून बोलल्या जात आहे तर महावितरण कंपनीचे ग्रामपंचायतकडे अंदाजे 35 ते 40 हजार रुपये इतके बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने ग्रामपंचायतचे विद्युत कनेक्शन आठ दिवसापासून बंद केले आहे विद्युत कनेक्शन बंद असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज लाईट अभावी बंद असल्याचे दिसून येत आहे तर गावांमधील बोरवेल सुद्धा बंद असल्याची ओरड जनतेकडून होताना दिसत आहे पुढे उन्हाळा असल्यामुळे पाण्याची समस्या जाणवू शकते. सदर शेतामधून कापूस किंवा इतर कोणतेही माल गावामध्ये आणण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे गावकऱ्यांनी व विरोधी पक्ष ग्रामपंचायत सदस्य यांनी असा निर्णय घेतला आहे की आपणच स्वखर्चातून नाली वरील रपटे टाकून रस्ता तयार करून शेतकरी शेतमजूर यांची समस्या दूर करू असे गावातील ग्रामपंचायत विरोधी पक्ष सदस्य दिनेश ठाकरे, रूपाली कनाके, स्नेहा हांडे यांनी सांगितले आहे
