
गुरुदेव सेवा मंडळा.वर्धा. यांच्या वतीने अनुसंधान गुरुदेव टेकडी प्रार्थना मंदिर येथे श्री वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उपासकांनी आज रोजी. वर्धापन दिन साजरा गेला. या प्रार्थना मंदिराला आज एक वर्ष पूर्ण झाले या मंदिराचे बांधकाम सुरू केले तेव्हा काही गुरुदेव उपासकांनी व वर्धा वासियांनी या बांधकामाला मदत करून हे प्रार्थना मंदिर उभारण्यात आले प्रार्थना मंदिर ची पूर्ण बांधकाम झाल्यानंतर तिथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली त्यामुळे इथे रोज सकाळी सायंकाळी ग्रामसफाई करून. सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम होत असते त्यानंतर सायंकाळी . सामुदायिक प्रार्थना नित्य नेमाने हे गुरुदेव उपासक करत असतात हे बांधकाम पूर्ण झाल्याची औचित्य साधून आज रोजी गुरुदेव उपासकांनी मोठ्या प्रमाणात या प्रार्थना मंदिरात वर्धापन दिन साजरा केला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिनांक 5/9/२०२4 ला. पहाटे 5.30.वाजता सामुदायिक. ध्यानाचा कार्यक्रम प्रार्थना मंदिर अनुसंधान गुरुदेव टेकडी गजानन नगर वर्धा येथे
गुरुदेव भक्ताच्या उपस्थिती वर्धापन दिन सामुदायिकपणे मोठ्या उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ग्रामसफाई त्यानंतर सामुदायिक ध्यान त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता सामुदायिक प्रार्थना प्रार्थना आटोपल्यानंतर सामुदायिक खंजरी भजनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रम आटोपल्यानंतर मान्यवर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्वांना अल्पोहार देऊन
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रवंदना घेण्यात आली
या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी यवतमाळून आलेले पाहुणे राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख हे सुद्धा हजर होते
शेवटी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा त्रिवार जय घोष घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
प्रतिनिधी अरुण देशमुख
जाहिराती साठी आणि आपल्या ताज्या घडामोडींच्या बातम्यांसाठी 7507722850
