
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
घाटंजी शहरालगत असलेल्या खापरी येथील श्री संजयराव इंगोले यांची विस्तार अधिकारी शिक्षण पदी पं.स.पांढरकवडा येथे पदोन्नती झाली.श्री इंगोले सर यांना आपल्या आयुष्यात अनेक संकटाशी सामना करावा लागला असून लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरविल्यामुळे जीवनातील संघर्ष अधिक तिव्र झाला.तरीही त्यांनी न डगमगता आपले शिक्षण पूर्ण केले.व ते१९८६ मध्ये प्राथ.शिक्षक म्हणून पं.स.घाटंजी मध्ये रुजू झाले.सरकारी नोकरी मिळाली तरी सरांचा उच्च शिक्षण घेण्याचा हव्यास काही कमी झाला नाही.पुढे शैक्षणिक कार्य, प्रशासनिक कार्यात , व्यत्यय येऊ न देता त्यांनी एम.ए.एम.एड यशस्वी रित्या पूर्ण करून कठोर परिश्रम आणि जिद्द अंगी बाणून प्रयत्न केल्यास यश हमखास मिळतेच ही गोष्ट सरांनी सिद्ध करून दाखविले.. संजयभाऊ यांच्या सारख्या ग्रामीण भागातील शिक्षकाने मिळविलेल्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून भाऊ वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.संजय इंगोले सरांचे विस्तार अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्रा.शिक्षक स.४४८/६४ शाखा घाटंजी तर्फे तसेच विलास भोयर खापरी परिवारा तर्फे अभिनंदन करण्यात आले.
