
प्रतिनिधी प्रवीण जोशी ढाणकी.
यावर्षी निसर्गाने शेतकऱ्याची जनु थट्टाच केलेली दिसते. जणू काही संकट या वर्षी शेतकऱ्यांची साथ सोडताना दिसत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट , काहींना पूर पिढीने, तर काहींना किडीच्या प्रादुर्भावाने तर काही करपा या रोगांने शेतकरी ग्रासला गेलेला आहे. या सर्व संकटातून मात करून बळीराजा हा नव्याने उभा रहाण्याचा प्रयत्न करतो आहे.तोच त्याच्या पुढे प्रश्न उभा राहतो तो म्हणजे बंद अवस्थेतील डी.पी. चा सध्या जिकडे तिकडे रब्बी हंगाम पेरण्याची लगबग चालू आहे. तसेच ढाणकी येथून काही अंतरावर करंजी हे गाव आहे. गेली चार महिने पासून वसंतराव पाटील डी.पी हा बंद अवस्थेत आहे. हा डी.पी अगोदर ६३ चा होता, अतिरिक्त लोड असल्यामुळे डी.पी हा महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे हा गेली चार महिन्यापासून जळाला आहे. महावितरण अभियंता यांनी वेळीच लक्ष देऊन डी.पी हा १०० देणे गरजेचे होते किंवा त्यावरचा लोड कमी करून एखादा दुसरा अतिरिक्त डीपी देणे गरजेचे होते. डी.पी.वर लोड जास्त झाल्याकारणाने डी.पी हा चार महिन्यापूर्वी जळाला. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची रब्बी पेरणी थांबली काही शेतकऱ्यांचे पीक हे अक्षरशः वाळत आहे. त्याचबरोबर करंजी गावातील ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गावातील शेतकरी व नागरिक चिंतेत आहे. वेळीच या बाबीची दखल न घेतल्यास ५ दिवसाचे आत डी.पी.चा प्रश्न मार्गी न लावल्यास करंजी ग्रामपंचायत कार्यालय व शेतकरी बंधू यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला असून झालेल्या प्रकरणास सहाय्यक कार्यकारी अभियंता व प्रशासन जबाबदार राहील अशी थेट ग्रामपंचायत कार्यालय करंजी व शेतकऱ्यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली आहे.
