
..
पोंभूर्णा शास्त्रीनगर येथील घटना;
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
जुने वादविवादाचे राग मनात ठेवून सुडभावनेतून एका युवकाने रागाच्या भरात फिर्यादीच्या घरासमोर उभी असलेली होंडा एक्टीवा स्कुटी(एम.एच.३४ बिके-७२८८)रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळून टाकत घटनास्थळावरून पसार झाला.यात स्कुटी पुर्णपणे जळून खाक झाली असून या घटनेमुळे परिवारातील सदस्य दहशतीत आले आहेत.आरोपी हर्षल प्रशांत बोढाले हा गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील रहिवासी आहे.पोंभूर्णा पोलिसांनी आरोपीला धानापूर येथून ताब्यात घेतले आहे.
पोंभूर्णा येथील प्रतिष्ठित व्यापारी योगेश संभाजी नैताम यांचे आरोपी युवकाशी जुने वादविवाद होते.आरोपी हर्षल प्रशांत बोढाले हा जुन्या वादविवादाचे राग मनात ठेवून सुडभावनेतून तो रविवारला गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथून पोंभूर्ण्याला येऊन त्याने पहाटे तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी योगेश संभाजी नैताम यांच्या घरासमोर उभी असलेली होंडा एक्टीवा स्कुटी(एम.एच.३४ बिके-७२८८) या गाडीवर पेट्रोल टाकून माचिसने पेटवून टाकत घटनास्थळावरून पसार झाला.घरचे मंडळी बाहेर आल्यावर सदर धक्कादायक प्रकार पाहून प्रचंड दहशतीत आले.घराशेजाऱ्यांना उठवून आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र तो पर्यंत स्कुटी जळून खाक झाली होती.सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी आरोपी विरुध्द भादवी कलम ४३५ अंतर्गत गुन्हा दखल करून आरोपी हर्षल ला धानापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार मनोज गदादे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ताराचंद आकेवार,अरविंद चुदरी अविनाश झाडे करीत आहेत.
