
सहसंपादक -रामभाऊ भोयर
कापसाला गेल्या वर्षी सुरुवातीला जो दर मिळाला तोच दर यंदा देखील मिळेल या आशेवर राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एप्रिल अखेरपर्यंत कापूस घरात साठवून ठेवला आहे एप्रिल संपला असला तरी भाववाढीची कोणतीही चिन्हे दिसत नाही यामुळे घरातच साठवून ठेवलेले पांढरे सोने आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कापूस विकावा की घरातच ठेवावा अशी वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
गेल्या वर्षी कापसाचे भाव तेजीतच होते सुरुवातीला कमी भाव मिळाला नंतर तर दहा हजाराहून अधिक भावाने कापूस विकला गेला शेवटच्या टप्प्यात तर १३००० हजारहून अधिक भाव मिळाला त्यामुळे यंदाच्या हंगामत सुद्धा असाच भाव मिळेल असे वाटत असताना मे महिना लागला असला तरी कापूस अजूनही आठ हजाराच्या वर गेला नाही उलट आठ हजाराच्या खाली आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक कोंडी झाली आहे.
आयतीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे शेतकऱ्यांना निदान दहा हजार रुपये तरी भाव मिळावा अशी अपेक्षा होती .
यंदा खरिपात अतिवृष्टीने नापिकी झाली त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली असे असले तरी उत्पन्न चांगल्या भावाने विकले जाईल आणि चार दोन पैसे अधिकच पदरात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना आहेत केंद्र सरकारने कापूस गाठी आहेत केल्या त्यामुळे कापूस दरात वाढ झाली नाही एकीकडे शेतीसाठी लागणारा खर्च वाढलेला आहे . कीटकनाशके रासायनिक खताच्या किमती वाढल्या आहेत मजुरांचे मजुरी सुद्धा वाढले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही अशातच केंद्र सरकारला सोयाबीन तूर आणि कापूस गाठी आयतीला उत आला आहे. यंदाच्या नापीकी मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे त्यांना कापूस पिकला नाही चांगला भाव असता तर केवळ आयातिच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
मे महिन्याला सुरवात झाली असून वीस ते पंचवीस दिवसावर येणार पेरणी
केंद्र सरकारने कापूस आयात केल्यानंतर त्यांच्या दरात वाढ होईल असा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला काही शेतकरी ने कापूस विकला तर काही शेतकऱ्यांना अजूनही विकला नाही त्यामुळे कापूस विकायचा की ठेवायचा असा प्रश्न पडलाय दरवर्षी शेतकऱ्यांकडून कापूस विक्री हे डिसेंबर मध्ये सर्वात जास्त प्रमाणात होत असायची यंदा मात्र एप्रिल उलटूनही अजूनही शेतकऱ्यांच्या घरात कापूसच साठवून आहे.तर काही शेतकरी कापूस विक्री टप्प्याटप्प्याने करत आहे.
कापसाचे भाव वाढ व्हावी
कापसाचे उत्पादन नेमके किती याचाही अंदाज बाजार आला नाही उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव पाहिजे म्हणून अजूनही शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत आता तरी भाव वाढ झाली पाहिजे असे शेतकऱ्यांना वाटत आहे मात्र ही भाव वाढ होते की नाही शंका वाटू लागली आहे.
