मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात पोस्ट बेसिक आश्रम शाळा सावरखेडा यांचं सुयश

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बालकास शिक्षण गुणवत्तापूर्ण देण्यास राज्य शासन महत्वकांशी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. आजचे व उद्याचे सक्षम नागरिक म्हणून जीवन जगण्यास आपणास विविध प्रकारच्या ज्ञानाची गरज असते. वाचन संस्कृतीचा विकास व्हावा. तसेच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी व नाविन्यपूर्ण किमान कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती राबवण्यासाठी आणि आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, खेळ ,क्रीडा, स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रमातून शाळाबाह्य विद्यार्थी शाळेकडे कसे आकर्षित होईल या विविध हेतूने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात आदिवासी उपजनक्षेत्रातील तसेच माड पट्टा अशा दुर्गम भागातून खाजगी व्यवस्थापन गटातून माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सावरखेडा या शाळेने पंचायत समिती राळेगाव जिल्हा यवतमाळ यांच्याकडून यथायोग्य मूल्यमापन करून द्वितीय क्रमांक पटकावून रुपये दोन लाख रुपयाचे पारितोषिक मिळविले आहे….. प्रोजेक्ट ऑफिस पांढरकवडा व राळेगाव तालुक्यातील एकमेव आश्रम शाळा सावरखेडा हे या उपक्रमात सहभागी होवुन नावारुपाला आली. या शाळेला उपक्रमामध्ये यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नामदेवजी नंदुरकर तसेच उपाध्यक्ष सुभाष भाऊ नंदुरकर व संस्थेचे सचिव सचिन भाऊ नंदुरकर यांनी अप्रत्यक्ष वा प्रत्यक्ष सहकार्य केलं तसेच पोस्ट बेसिक आश्रम शाळा सावरखेडा येथील कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर, कार्य कुशल, प्रत्येक उपक्रमात हिरहिरीने भाग घेणारे मुख्याध्यापक हरीशजी डंबारे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि पंचायत समिती राळेगाव येथील बीडिओ पवार साहेब, गटशिक्षणाधिकारी शेळके साहेब, सावरखेडा सर्कल येथील केंद्रप्रमुख सतिश आत्राम साहेब,माडेवार सर, शिक्षणाधिकारी राऊत मॅडम, उपशिक्षणाधिकारी गुंडे साहेब,गोडे साहेब आणि कनिष्ठ लिपिक रुईकर बाबू,माजी प्राचार्य श्रीकांत लाकडे स्व. खुशालराव मानकर कमवी सावरखेडा . यांच्या अथक प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली हे सुयश प्राप्त झाले. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पांढरकवडा नवं नियुक्त गोडे साहेब(IAS) यांनी या शाळेचे भरभरून कौतुक करुन मार्गदर्शन केले आणि याला हातभार म्हणून सावरखेडा गावातील गावकरी पालक रुंद व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावरखेडा येथील शाखाप्रमुख स्वप्निल सर यांनी एक लाख रुपयाचा धनादेश देऊन लोकवर्गणीतून, ही शाळा नाव रूपाला येण्यासाठी मदत दिली आणि त्यांच्यामुळेच राळेगाव तालुक्यातून आपण द्वितीय क्रमांक प्राप्त करू शकलो असाच सहभाग नोंदवून या शाळेनी आपापली प्रगती करत राहावं यासाठी शुभेच्छाचा वर्षाव या शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर होत आहे.