महाराष्ट्र नवनिर्माण जनहित व विधी विभागाचा लवकरच अमरावती विभाग दौरा-अँड किशोर शिंदे

महाराष्ट्र नवनिर्माण विधी व जनहित विभागाचे अध्यक्ष तथा सरचिटणीस मा श्री किशोरजी शिंदे साहेब यांचा सत्कार जनहितच्या राज्य उपाध्यक्ष प्रा संगीता ताई चव्हाण यांच्या हस्ते पुणे येथील संपर्क कार्यालयात करण्यात आला . यावेळी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे, मालेगाव तालुका संघटक महेश देशपांडे, सौ वनिता पांडे,सौ पुष्पा रौंदळे, आदी उपस्थित होते . यावेळी विदर्भातील अमरावती विभागातील जिल्ह्यात जनहित व विधी विभागाचे बांधणी करण्याकरता लवकरच दौरा आखण्यात येणार आहे . पक्ष वाढीसाठी, प्रत्येक जिल्ह्यात बांधणी करण्यात येणार आहे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली . जनहित विभागाच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात व अमरावती विभागात सौ. शर्मिला राज साहेब ठाकरे महिला सन्मान योजना २०२३ व २०२४ राबवण्याबाबत चर्चा करून महिला सक्षमीकरण महिला बचत गटाला अनुदान वितरण महिला बचत गटाला रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण योजनेच्या उद्दिष्ट सांगण्यात आले.