राळेगाव येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव फटाके फोडून केला साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी : रामभाऊ भोयर

महाराष्ट्रातील औरंगाबाद पदवीधर मतदार संघ तसेच अमरावती पदवीधर मतदार संघ व नागपूर शिक्षक मतदार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत औरंगाबाद येथील महाविकास आघाडीचे विक्रम काळे तर अमरावती येथे महविकास आघाडीचे धिरज लिंगाडे तर नागपूर येथील शिक्षक आमदारांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी,सोबत बाविस शिक्षक संघटना समर्पित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी भरघोस मतांनी विजय संपादन केला.हा विजय पदवीधर बंधू भगिनी, कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन योजना अशा अनेक विषयाला अनुसरून झाला असून त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी राळेगाव काॅंग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयासमोर आज दिनांक 3/2/2023 रोज शुक्रवारला सायंकाळी पाच वाजता फटाके फोडून व विजयाचे नारे देत आनंद साजरा करण्यात आला.त्यावेळी जेष्ठ नेते अरविंद वाढोणकर, तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, मिलिंद इंगोले,संजय देशमुख,रवि शेराम, अंकुश रोहणकर,भरत पाल,श्रावनसिंग वडते, पुरूषोत्तम चिडे, अंकुश मुनेश्वर, अशोक काचोळे,मोहन नरडवार, गजानन पाल,धवल घुंगरूड, भैय्या बहाळे,राहूल बहाळे,रामू भोयर, प्रफुल्ल तायवाडे,अफसर अली, गोवर्धन वाघमारे, राहूल बहाळे, अंकित कटारिया यांचे सह अनेक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडणूकीचा विजय हा पुढील निवडणूकीसाठी विजयाचे संकेत असल्याचे अरविंद वाढोणकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.