शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी जयंत कातरकर यांची निवड

सहसंपादक: रामभाऊ भोयर

हिंगणघाट तालुक्यातील येरला येथिल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खंदे कार्यकर्ते असलेले जयंत कातरकर यांच्या कार्याची दखल घेऊन आज शनिवारी ९ मार्चला २ वाजता नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिल्हा मनसे शेतकरी सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.जयंत कातरकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडून सर्व समान्य नागरी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.त्याच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदीची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.