
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
देवधरी येथील अवैधदारू विक्री बाबत मनसे च्या नेतृत्वात महिला एकत्र आल्या.त्यानी वडकी ठाणेदाराना निवेदन देखील दिले. दोन दिवसांनंतर आज नाल्याच्या काठावर अवैध्य दारू विकली जात असल्याची माहिती महिलांना मिळाली आणि त्यांनी थेट घटनास्थळ गाठले, महिलांचा रुद्रावतार पाहून दारूविक्रेते पळून गेलें. मात्र तेथे दोन पेट्या दारू पकडण्यात आली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी दारूच्या पेट्या जप्त केल्या.
राळेगाव तालुक्यातील मौजा. देवधरी येथे हा प्रकार सुरु होता . कुठलाही परवाना नसतांना खुलेआम अवैद्य दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे, परंतु पोलिस प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याने येथील महिला आक्रमक झाल्या. मनसे च्या नेतृत्वात वडकी पो. स्टे. वर शेकडो नागरिक धडकले. अवैध्य दारू विक्री विरोधात ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. हा प्रकार बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता.
कारवाई होतं नसल्याने दारू विक्रेत्यांची हिंमत वाढली आहे . महिलांच्या संयमाचा बांध अखेर फुटला, त्यांनी स्वतःच दारू पकडली. या बाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी या महिलांनी केली आहे.
मनसे राळेगाव तालुका संघटक नरेंद्र खापणे यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांसह नागरिकांनी ही मागणी लावून धरली. . गावातील अवैध देशी दारू विक्री बंद करा अशी मागणी महिलांनी केली आहे. यावेळी गावातील असंख्य महिलांसह मनसे सैनिक उपस्थित होते.
