
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथे दिनांक ४-६-२५ रोजी बसस्थानका लगत असलेला अपे अटो क्र.एम.एच.२९ व्ही ९४०४ अटो चोरुन नेल्या राळेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होताच नव्यानेच रुजु झालेल्या पोलिस निरीक्षक शितल मालटे या अॅशन मोडवर येऊन आपल्या पोलिस सहकार्याना घेऊन तातडीने कापसी वर्धा रोडने चोरी करून नेलेल्या अपे अटोचा पाठलाग करुन कोसुर्ला गावाजवळ चोरी गेलेला अपे अटो दिसला असता चोरटा अल्टो ठेवून पळून जात होता त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेऊन खाकीच्या स्वरुपात विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व सदर आरोपीने १)मोटरसायकल हिरो होंडा फॅशन क्र एम.एच.२९ एस ०७४१ कींमत ५०,००० हजार रुपये,२) मोटरसायकल डिस्कवर क्रमांक एम.एच.३२ झेड ०९०५ किंमत ५०,००० हजार रुपये या दोन्ही मोटरसायकलची आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ नाना रमेश नेहारे वय २३ वर्षे रा.आपटी,ता.राळेगाव याने चोरी केल्याची कबुली दिली.असता त्यांच्या हद्दीतील हस्तगत करुन त्यांच्यावर कलम ३०३/ (२) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही कुमार चिंता पोलिस अधीक्षक,पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक, रामेश्वर वेंजणे उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा, शितल मालटे पोलिस निरीक्षक राळेगाव पोलीस स्टेशन, दिपक राणे पोलिस उपनिरीक्षक, गोपाल वास्टर जमादार,सुरज चिव्हाणे पोलिस अंमलदार यांनी केली.
