दहेगाव येथील युवकाचा मृत्यूदेह विहिरीत आढळला

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे शेत शिवारात विहिरीत युवकांचा मृतदेह आढळला ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली त्यांच्या मुळे एकच खळबळ उडाली, प्रविण किनाके वय 30 ह.मु दहेगाव असे मृताचे नाव आहे, वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्ही जवादे शेत शिवारात सुरेंद्र पवार यांच्या शेतातील विहिरीत युवकांचा मृतदेह आढळला वडकी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले . पोलीसांनी मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रूग्णालय राळेगाव येथे पाठविला, मृतक युवक हा दहेगाव येथे सहा ते सात वर्षांपासून राहतं होता त्यांची बहीण गावांमध्ये राहते पण तो तिच्या कडे न राहता मोलमजुरी करून जिवन जगत होता कधी मंदिर कधी कोणाच्या शेतवर वास्तव्य करायचा तो जिकडे मरण पावला त्यांचं शिवारात शेतीचे काम करायाचा पुढील तपास वडकी पोलिस करीत आहे.