
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरात शिवशाही बसमधे तरूणीवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महिलांमधे भीतीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर येथील ग्राहक पंचायतने आगार प्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली व विविध मागण्याचे निवेदन सादर केले. येथील बस स्थानक परिसरात दिवस, रात्र सुरक्षा गार्डची नियुक्ती करण्यात यावी.
बस स्थानक व बस डेपोततील बसेसची रात्री परतल्यानंतर नियमीत तपासणी करण्यात यावी. बस पूर्णपणे लॉक (कुलूपबंद) करण्यात यावी. (चालक, वाहक) बस मधे मुक्कामी नसावे.
तसेच आगारत रात्रीचा मुक्काम असल्यास महीला वाहकांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था असावी. महीला वाहकांना सुरक्षितता असावी.
एसटीचे अधिकृत सायकल, स्कूटर स्टँड नसल्यामुळे तातडीने प्रवासी ग्राहकांना एसटीचे अधिकृत सायकल स्कूटर स्टँड उपलब्ध करून द्यावे.
बस चालकांना गाडी आत व बाहेर नेताना बरीच कसरत करावी लागते असते. अशा वेळेस बस चालकांची नजर चूक झाल्यास अपघात होऊ शकतो. तरी यावर परिसरात योग्य ती कारवाई करावी.
बस स्थानक स्वच्छ असावे. प्रवासी ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यात याव्या. अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडून करण्यात येत आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रमुख पदाधिकारी यांचे सोबत नियमित वा महिन्यातून एकदा तक्रारी सोडविण्या करीता बैठक आयोजित करण्यात यावी. यावेळी आगार प्रमुख शशिकांत बोकडे यांना लेखी निवेदन देण्यात आले.
तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष डॉ. के. एस. वर्मा, सचिव माजी प्राचार्य मोहन देशमुख, कोषाध्यक्ष भूपेंद्र कारीया, सदस्य राजेश काळे आदी हजर होते.
आगार प्रमुखांनी याबाबत त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
अशाच प्रकारचे निवेदन परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रक यांना देण्यात आले.
