
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी शहरात मल्टीस्टेट क्रेडिट सोसायट्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात असून
या प्रणालीवर हळूहळू जनतेचा विश्वास कमी होताना दिसत आहे.काही महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेने आपला डोलारा उभा केला आणि लाखोचा गंडा सर्वसामान्य जनतेला घातला.या यंत्रणेमुळे अनेकांची रक्कम गेल्यामुळे ठेविदार हवालदिल झाले असताना रक्कम मिळू शकेल असा कुठल्याही प्रकारचा दिलासा त्यांना मिळताना दिसत नाही.येथील गुंतवणूक म्हणजे पैसे बुडणे, रक्कम परत न मिळणे, पैसे घेऊन पळून जाऊन सर्वसामान्यांना कर्जबाजारी करणे अशाच प्रयोग दिसतो आहे.
एका पतसंस्थेने पोबारा केल्याच्या नाट्यप्रयोगानंतर राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या भोंगळ कारभाराने मध्यमवर्गीय ट्रॅक्टर व दुचाकीचे पंम्चर काढून उदरनिर्वाह करणाऱ्या गणेश धवसे यांना फटका बसला आहे. दैनंदिन वसूल करणारा आरडी एजंट ने अनेकांची रक्कम घेऊन पोबारा केला व सर्वसामान्य लोकांनी पै-पै साठवून ठेवलेल्या रकमेवर डल्ला मारल्याचे कळते. याच पतसंस्थेतील रवी एकराळे यांनी अनेकांचे खाते परस्पर काढून पासबुकात रक्कमेची नोंद करून सोसायटीमधील खात्यात रक्कम जमा न करता थांग पत्ता लागू न देता रकमेची अफरातफर करून या रक्कमेचा फायदा स्वतः हा घेऊन ग्राहकांची फसवणूक केल्याची तक्रार गणेश धवसे यांनी केलेली आहे. एका ठिकाणी तर ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी आधुनिक प्रणाली दिली व ग्राहकांनी त्याचा वापर रक्कम भरण्यासाठी केला असता तेथील संकेतस्थळ अर्थातच(स्कॅनर) साहेबांचं नाव दर्शवितो?? त्यामुळे ग्राहकांनी त्याच्या खात्यात रक्कम टाकल्या नंतर ती त्यांच्याच खात्यात गेली की साहेबांच्या खात्यात वर्ग झाली हे पाहणे जरुरी आहे तेव्हा अधिक व्याज दर देणाऱ्या गंगा व नदया धो धो वाहत असताना अशा ठिकाणी ग्राहकांची फसगत होऊ शकते.
अत्यंत अवघड असलेल्या ट्रॅकर आणि ईतर वाहनाचे पंक्चर काढून गणेश धवसे यांनी रक्कम जमा केली. पण पतसंस्थेच्या गलथान कारभारामुळे आज स्वतःच्याच रकमेसाठी खस्ता खाव्या लागत आहे. विशेष म्हणजे ज्या पतसंस्थेने फसवणूक केली,ती यंत्रणा सांगत आहे की ग्राहकानी खात्यात रक्कम जमा होत आहे की नाही हे पाहणे ग्राहकांची जबाबदारी आहे.असा मौलिक सल्ला देत असताना,ती काम करणारी यंत्रणा नेमके काय करत होती. ज्या ग्राहकाला आपल्या मोबाईलवर संदेश आला किंवा वाचणे लिहिणे याचे ज्ञान नसताना त्याच्या रकमेची जबाबदारी ही पतसंस्थेची नाही?? हे न समजणारे रहस्य आहे. पतसंस्थतील जवळपास १०० पासबुक सही- शिक्क्यासह गायबच कसे होतात?
अनेक ग्राहक सोनेतारण कर्ज काढतात. जवळील दागिना मोड करून त्यातून रक्कम मिळेल. पण काही दागिने प्रसंगातील आठवण म्हणून असते व ती मोड अनेक ग्राहकांना
करावी वाटत नाही, म्हणून सोने तारण कर्ज घेऊन रक्कम जमवून वेळ साजरी केल्या जाते. पण आता ढाणकी शहरातील पतसंस्थेत ठेवलेले सोनेतारण सुद्धा सुरक्षित आहे की नाही ?याची चर्चा सुद्धा जनमाणसात आहे. पतसंस्थेतून कर्ज स्वरूपात रक्कम काढत असताना अनेक नियम अटी शर्ती व साक्षीदाराने शाखा प्रबंधकाच्या समोरच स्वाक्षरी केल्यानंतर कर्ज स्वरूपात रक्कम मंजूर होते. मग ग्राहकाच्या रकमेवर कर्ज काढत असताना तेथील यंत्रणेची जबाबदारी आहे की खरंच ग्राहक दैनंदिन ठेव ठेवीवर कर्ज काढत आहे की नाही हे पाहणे जरुरी असताना परस्पर स्वाक्षरी करून कर्जस्वरूपात रक्कम अदा करणे हे यंत्रणेला जमते?? याआधी सुद्धा अशा काही घटना शहरात घडल्या पण रक्कम परत मिळाली नाही. फसल्या व पीचल्या गेलेला सर्वसामान्य ग्राहकच. शिमग्याची बोंब चार दिवसच असते अशी एक प्रथा रूढ झाली, असे या यंत्रणेला वाटत?? व जनता पुन्हा सगळे काही विसरून जाते व होणारे व्यवहार पूर्वपदावर येऊन येरे माझ्या मागल्या या पलोपदामुळे ही यंत्रणा निसवली निर्ढावली. त्यामुळे यांना अद्दल घडवायची असल्यास व येणाऱ्या काळात अशी फसगत होऊ नये, याकरिता सर्वसामान्य जनतेने विचार करून व काळजीपूर्वक सजग राहूनच यांच्याशी व्यवहार केला पाहिजे असे सर्व सामान्य जनतेतून बोलल्या जाते. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात फसगत करून गेलेला तरुण एकटाच आहे की कोणता हेच काम करणारा महागुरू त्याच्या पाठीमागे आहे??
चौकट
ज्यावेळी मल्टीस्टेट व इतर पथसंस्थांना ठेवीची गरज असते त्यावेळी येथील यंत्रणा अत्यंत मधुर व गोड बोलून ठेवीदार यांना ठेव आणा व मोठ्या प्रमाणात कमिशन मिळवा असे सांगतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीने संपर्क करून ठेव ठेवायची आहे असे सांगितल्यानंतर अधिकारी आणि त्यांचा सुटा बुटातील चेल्या-चपाट्यांचा लवाजमा त्यांच्या मल्टीस्टेट पतसंस्थांचे मोठ्या प्रमाणातील व्याजदर आहे असे सांगून ठेव ठेवण्यास भाग पाडतात किंबहुना सर्व ठेवीदारांना एकत्रितपणे बोलवून मेजवानी सुद्धा दिल्या जाते त्यामुळे आता ठेवीदारांनी ठेव मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली तर?? ढाणकी शहरात सुद्धा अनेक ग्राहक आता सतर्क झाले असून कोणीही यावेळी ठेवी दिली नसल्याकारणाने चेल्या-चपाट्या यांनी आपला मोर्चा नातेवाईकाकडे वळवल्याचही कळते. मोठ्या प्रमाणात व्यवहार कमी झाले असल्याकारणाने तेथील यंत्रणेला दिवसभर मोबाईलवर टीचक्या मारण्याचे काम असते असे सर्वसामान्य ग्राहकाकडून बोलल्या जाते.
