
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असले तरी देशात इतर अन्य ठिकाणी मतदान व्हायचे आहे त्यामुळे मतदारांनी मतदान झाले असे समजू नये इतर ठिकाणीही मतदारांना प्रोत्साहित केले पाहिजे विविध राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया राबवायची आहे पण ही सगळी प्रक्रिया करत असताना मतदानाचा टक्का कमी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले. देशात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज दिसते ते करत सुद्धा आहेत.केवळ निवडणूक आयोगावर अवलंबून राहून चालणार नाही सर्वसामान्य मतदात्यांना मतदानाची किंमत पटवून दिली तरच ते आपलं अमूल्य मत देतील मतदानाच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच जे काही खासगी क्षेत्रातील कामगार असतात त्यांना सुद्धा सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला निवडणूक आयोगाने हे एक चांगले काम केले पण या सुट्टीचा फायदा लोकांनी मतदान करण्यासाठी करायला हवा अनेक लोक या दिवशी मौजमजा किंवा उत्कृष्ट पर्यटन ज्या ठिकाणी आहे जातात व मतदान टाळतात त्यामुळे सशक्त लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा असून त्याला कुठेतरी बंधन घालण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात या निवडणुकीपासून झाली तर येणाऱ्या काळात त्याचा लाभ होईल विधानसभा, जिल्हापरिषद, महानगरपालिका, पंचायत समिती इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत साहाजिकच यातील मतांचा आकडा वाढवण्यास उपयोग मदत होईल म्हणून मतदानासाठी मतदात्यांना प्रवृत्त करणे गरजेचे बनले पण आता सर्वसामान्य जनता सुद्धा मतदानाप्रती व कर्तव्याची जाण अनेकांना होताना दिसत आहे मतदानासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी सुद्धा अनोख्या पद्धतीने प्रयत्न होताना दिसत आहे.
