वणी,तरोडा,सुंदरनगर येथे जागतिक चिमणी दिवस साजरा

वणी 20 मार्च 2023 हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस या दिवसाचे औचीत्य साधुन आज एम.एच.29 हेलींग हँडच्या मार्गदर्शनाखाली वणी तरोडा येथील काही युवकानी एकत्र येत चिमणी दिवस साजरा केला.निसर्गाप्रती एक भावनीक आणी मानुसकीची जोड दिली. समाजाने या लहान आणी दुर्मिळ असणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजाविसाठी झटले पाहीजे या इच्छेनेच वणी,तरोडा येथील काही युवकानी एकत्र येत स्वतः’वर्गणी गोळा करत लोखंडी पिंपे व खरडे(बॉक्स) खरेदी करून चिमण्यासाठी पाण्याची आणी दाणे खाण्याची व्यवस्था केली.
त्यासाठी त्यानी गावातील H.D कंपनी असलेले मंजूभाऊ उंभारे यांची मदत घेउन यांच्या कडून काही पिपे घेउन चिमण्यासाठी राहुटी तयार केली. या बनवलेल्या लोखंडी पिप्याचे,राहुटी संपुर्ण गावात आणी तरोडा मार्ग वणी राममंदीर मार्ग निवली वणी तरोडा मार्ग निलजई मार्गे झाडावर टागुण त्यात पाणी आणी खाण्यासाठी दाणे भरले.युवकांनी इथ पर्यंत मजल न मारता तरोड़ा येथील जी.प. प्राथमिक शाळा तरोडा, हनुमान मंदीर, ग्राम पंचायत तरोडा,श्री राम मंदीर सुंदर नगर, ग्रामिण रुग्णालय,सुंदर नगर येथील पार्क, सोनबा देव मंदीर,निलजाई किराणा दुकान वैद्य, व ज्या ठिकाणी पक्षी जमा होतात अशा ठिकाणी या लोखंडी पिपे राहुटी ठेवण्यात आल्या.यासाठी अनीकेत कुमरे,राजु भोगेकर,रमेश भादीकर, नितीन मानुसमारे,रवी नन्नावरे,शुभम खिरटकर,देवेंद्र भोगेकर,प्रदीप नांदे,टिमदेव बेलेकर,तेजस कोंगर,पाडुरंग जेउरकर,जगन जांभुळकर,यांनी मोठी मेहनत घेत हा चिमणी दिवस साजरा केला.यासाठी या युवकांवर गावातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. आजचा युवक हा प्रेरणादायी असला पाहीजे आणी निसर्गाशी त्यांचे घट्ट नाते असले पाहीजे हेच या युवकांकडुन शिकायला मिळते आहे.त्यांच्या या कार्याला पाहुण गावातील आणी इतर गावातील तरुण जागा होइल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.