
ऊ.बा.ठा. शिवसेना गटाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी नुकत्याच पार पडलेल्या नितीनजी गडकरी यांच्या सभेदरम्यान शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ढाणकी व आजूबाजूच्या परिसरात ऊ.बा. ठाकरे गटाला फटका बसण्याचे संकेत दिसत आहे. रमेश गायकवाड हे अतिशय शांतता प्रिय व समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात तसेच काही दिवसातच नगरपंचायत च्या निवडणुका सुद्धा येऊन ठेपलेल्या आहेत. याचा परिणाम महाविकास आघाडीला दिसून पडेल. काँग्रेस तर्फे साहेबराव कांबळे यांना तिकीट मिळाल्यामुळे विजय खडसे नाराज होऊन त्यांनी अपक्ष म्हणून मतदारसंघांमध्ये उभे आहे तर एकीकडे ऊ बा ठाकरे शिवसेना गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते ते मोहनराव मोरे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत महाविकास आघाडीचे मताचे विभाजन होत असतानाच आता मात्र ऊ .बा. ठाकरे शिवसेना गटाचे नेते यांनी भाजपचा झेंडा हातात घेतल्यामुळे भाजपला नव संजीवनी मिळाली आहे त्यामुळे भाजपात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तर ऊ.बा. ठाकरे शिवसेने ला खिंडार पडली आहे.
