
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे शिव प्रतिष्ठान युवा मंचाच्या वतीने दि 17 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी नुसार साजरी करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण करून माल्यअर्पण व पुजन सौ राधाबाई टेकाम सरपंच दहेगाव व श्री अरविंद भाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्व मावळ्यांनी जय शिवाजी जय भवानी अश्या घोषणा दिल्या
सायंकाळी 6 वाजता शिवाजी चौकातून गावातील प्रमुख मार्गाने डिजे व ढोल ताशांच्या नादात नाचत गाजत मोठ्या उत्साहात भव्य रॅली काढण्यात आली तसेच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी, किशोर दातारकर,मारोती डाहुले,अमोल गमे, विठ्ठल जोगी,राज लांडे, सुनील कुबडे, किशोर खोके विजय कुबडे,भारत जिकार ,सुनील परचाके खुशाल काळे प्रमोद उताणे शेख शब्बीर, वैभव व्यापारी,सुधाकर पावडे, पद्माकर जुमनाके, तथा सर्व शिव प्रतिष्ठान युवा मंचाचे सदस्य यांनी सहकार्य केले तसेच विठ्ठल झाडे पत्रकार, शंकर पंधरे पत्रकार व दहेगाव गावातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
