
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील डॉ असोसिएशन ची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली असून तालुका डॉ. असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ भोयर ,तर सचिव पदी डॉ.राहुल पालकर यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.
डॉ.असोसिएशनची कार्यकारणी दिं. २९ एप्रिल २०२५ रोज मंगळवार ला हॉटेल गॅलेक्सी येथे पार पडली असून या कार्यकारणी मध्ये सर्वानुमते असोसिएशनच्या अध्यक्षपदी म्हणून डॉ.सोमनाथ भोयर तर उपाध्यक्ष मनोज पांगुळ ,सचिव डॉ. राहुल पालकर तर मुख्य सल्लागार म्हणून डॉ.ओम प्रकाश फुलमाळी व डॉ.कुणाल भोयर यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले आहे.
या कार्यकारणी निवडी दरम्यान उपस्थित डॉ. अशोक थोडगे, डॉ.अश्विनी थोडगे, डॉ.सविता पोटदुखे, डॉ. श्रीकांत उजवणे, डॉ. पुरुषोत्तम उगेमुगे ,डॉ. निलेश शेंडे ,डॉ, चंद्रशेखर उजवणे, डॉ. प्रतीक पांडे, डॉ.,सागर कुळसंगे, डॉ. अमोल खडसे, डॉ.हेमंत गलाट, आदी यावेळी उपस्थित होते
