

उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
कोरटा ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे काल आदिवासी बांधवांचा ४९ वा भव्य सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. आदिवासी बांधवांच्या या सोहळ्यास राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड हे उपस्थित होते. हा अतिशय आनंदाचा आणि मांगल्याचा क्षण होता.भव्य दिव्य विवाह सोहळ्यास मा. संजय भाऊ राठोड हे उपस्थित राहून बांधवांशी संवाद साधला. यावेळी सर्व वधुवर नवदाम्पत्यांना आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
