
राळेगाव तालुका प्रतिनिधी : रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात युतीचे सरकार असतांना शेतकऱ्यांना विमा कंपन्या कडून नुकसान भरपाई मिळवून घेतली होती . परंतु महाराष्ट्रातील आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पिक विम्याच्या संदर्भातील निकष बदलविले गेले शेतकऱ्यांनी पीक विमा भरला परंतु त्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही .हा शेतकऱ्यांचा केलेला विश्वासघात असून आघाडी सरकारने कोरडी आश्वासने देऊन पीक विमा न देता शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे असा आरोप आघाडी सरकारवर माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. डॉअशोक उईके यांनी केला आहे. शासनाने सन 20 21 व वीस बावीस या वर्षासाठी विमा कंपनी सोबतचे केलेले करार रद्द केले परंतु या कृतीने सन 20 20 मध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणारे नाही त्यामुळे युतीचे देवेंद्र फडणवीस सरकारचे वेळेचे निकष धरूनच आघाडी सरकारने विमा कंपन्यांशी करार करावा अशी मागणी आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी केली आहे.या संदर्भात मा मुख्यमंत्र्यांना दोनदा पत्र दिल्याचे सांगितले खरीप पिकांच्या विमा मध्ये राळेगांव तालुक्यातील शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहे आघाडी सरकारने मोठ्या रकमेचा नफा विमा कंपन्यांना मिळवून दिला आहे महाराष्ट्र सरकारने 20 19 चे निकष ग्राह्य धरून सन 20 20 यावर्षीचा विमा राळेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी आमदार उईके यांनी केली आहे आज दिनांक एकोणवीस जून2021 रोजी वाढोणा बाजार येथे महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ अंतर्गत नवक्रांती लोक संचलित साधन केंद्र राळेगाव यांचे विद्यमाने दोनशे गरजू शेतकऱ्यांना बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा डॉअशोक उईके होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे ,मार्गदर्शक रंजन वानखडे, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे ,जी प सदस्य सौ प्रीती संजय काकडे ,सरपंचां सौ जयश्री मांडवकर, भाजपा शहर अध्यक्ष डॉ कुणाल भोयर,महिला आघाडी प्रमुख विद्या लाड,उपसरपंच योगेश देवतळे,शेअर अली लालानी,शारदाणंद जयस्वाल,वंदना कुटे, विवेक दौलतकर,गजानन लढि, अरुण घुगरे, विनोद मांडवकर,मारोती धोटे उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा समाचार घेतला व भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पिक विमा असो की कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही याप्रसंगी दिली तसेच प्रत्येकाने लसीकरण करून घ्या असे आवर्जून सांगितले कार्यक्रमाला वाढोना बाजार परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थितीती होती. यानंतर आमदार उईके यांनी भुलगड तलावा जवळ असलेल्या मेंढपाळांच्या बेड्या ला भेट दिली व समस्या ऐकून घेऊन जिल्हाधिकारी यांना चराई क्षेत्रा बाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले .
