समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी साधला जर्मनी येथील विद्यार्थीनिशी संवाद,समता पर्व निमित्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर यांच्या माध्यमातून आयोजित समता पर्व च्या निमित्ताने समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी जर्मनी येथील काया क्रोरेर यांच्याशी संवाद साधला.

स्थानिक सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथे जर्मनी येथून आलेल्या काया क्रोरेर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये जर्मनी येथील शैक्षणिक धोरण,तेथील आरोग्य व्यवस्था , महिलांना असणाऱ्या विविध क्षेत्रातील संधी,भौगोलिक परिस्थिती,आदिवासी संस्कृती या सर्व बाबींवर इतंबुत माहिती उपस्थितांना दिली.

समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रसंगी मनात पडलेल्या प्रश्नाची उत्तरे देखील क्रोरेर यांच्याकडून घेतली.या कार्यक्रमाला मंचावर अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.संजीव निंबाळकर , प्रा.डॉ.ममता ठाकूरवार ,नागपूर येथील विलास शेंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.ममता ठाकूरवार यांनी करून दिला. यावेळी विलास शेंडे यांनी उपस्थितांना मोलाचा संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. किरनकुमार मनुरे यांनी तर आभार प्रा.नितीन रामटेके यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी यांची उपस्थिती होती.