सहसंपादक : रामभाऊ भोयर
हैदराबादहून नागपूरकडे टमाटे घेऊन जाणारा ट्रक आणि नागपूरहून हैदराबादकडे जाणारा दुसरा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास वडकी-राळेगाव रोडवरील पंजाबी ढाब्याजवळ घडला.
या धडकेत दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हैदराबादकडून येणारा ट्रक चुकीच्या दिशेने येत असल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. धडकेनंतर हैदराबादकडून येणारा ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.
