संभाजी ब्रिगेड आर्वी तर्फे ईद ए मिलादुन्नबी साजरी

आर्वी/प्रतिनिधी/पियूष रेवतकर

आर्वी:- संभाजी ब्रिगेड पार्टी शाखा आर्वी तर्फे ईद ए मिलादुन्नबी निमित्त आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व मुस्लीम बाधवांना थंड्या पाण्याचे वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मिष्टान्न वाटप केले.या शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व मुस्लीम बांधवांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी संभाजी ब्रिगेडचे आर्वी तालुकाध्यक्ष रोहन हिवाळे, आर्वी शहर उपाध्यक्ष अर्शद राही, विनायक जयसिंगपूरे,यश कातोडे, लतेश शिरभाते,आकाश हिरकन,वैभव करपे,अमोल शिरभाते, मयूर लवटे,यश डहाके, मिलिंद दहाट आदी सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.