
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आष्टोणा हे गांव वारकरी सांप्रदायाचे गाव म्हणून ओळखले जात असुन वारकरी सांप्रदायाचा प्रत्येक कार्यक्रम/उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने येथे साजरे केल्या जातात
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा निमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण काकडा भजन व हरिपाठ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोज सोमवारपासून सुरू झालेला हा उत्सव दररोज सकाळी ५ ते ६ काकडा भजन, ६ ते ८ ज्ञानेश्वरी पारायण, दररोज सायंकाळी ६ ते ८ हरिपाठ, रात्री ८ ते १० ज्ञानेश्वरी पारायण असा नित्य नियमाने दररोज मोठ्या उत्साहात सुरू झालेला हा कार्यक्रम दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सोमवारला सकाळी ५ ते ६ व काकडा भजन ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण ची सांगता करण्यात आली.
तसेच त्यानंतर लगेचच ९ ते १२ वाजता काल्याचे भजन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता श्री संत ज्ञानेश्वर माऊली ग्रंथाची प्रदक्षिणा संपूर्ण गावात वारकरी भजन मंडळ आष्टोणा यांच्या पुढाकाराने हरिपाठ भजनासह मोठ्या उत्साहात मिरवणूक काढुन साजरा करण्यात आला. तसेच गावातील महिला भजन मंडळ सुद्धा या उत्साहात मिरवणूकीत सामील झाले होते. मिरवणूक संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा गावकऱ्यांनी लाभ घेतला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे विणेकरी दरवर्षी प्रमाणे यंदाही ह. भ.प. भुपेश महाराज काकडे तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे मृदंग वादक ह.भ.प. अमर महाराज ठाकरे हे होते सोबतच गायणाची सातसंगत ह.भ.प. अमोल महाराज देठे आणि ह.भ.प. आकाश महाराज वैद्य यांनी पार पाडली तसेच हा सर्व कार्यक्रम वारकरी भजन मंडळ आष्टोणा यांच्या पुढाकाराने/सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी घेतलेल्या तिथीला गावात ज्ञानेश्वरी पारायण करण्याचा वर्षानुवर्षे सुरू असलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यामध्ये अद्याप खंड पडू दिला नाही भविष्यात सुद्धा हा कार्यक्रम असाच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल.
:- डॉ. सुरेश वामनराव महाजन
(वारकरी संप्रदाय आष्टोणा)
