सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे संविधान दिन साजरा (संविधान सप्ताह चे आयोजन)

सहसंपादक रामभाऊ भोयर

आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ ला
श्री सत्यसाई बहुउद्देशिय शिक्षणं व प्रशिक्षण संस्था संचलित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला त्याच प्रमाणे संविधान सप्ताह चे आयोजन करण्यात आले
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री सचिन ठमके सर (रिसोर्स पर्सन ऑफ सी.बी.एस.ई.) होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सत्यवान सिंग दुहन हे लाभले होते
या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी प्राचार्य सचिन ठमके यांनी संविधानाचे महत्व समजावून सांगितले ते म्हणाले
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. राज्यघटनेने भारत सरकार कायदा १९३५ ची जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले. संवैधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी, त्याच्या रचनाकारांनी कलम ३९५ मध्ये ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले. भारत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपले संविधान साजरे करतो.
संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. १९५०चे मूळ संविधान हेलियमने भरलेल्या केसमध्ये नवी दिल्लीतील संसद भवनात जतन केले आहे. आणीबाणीच्या काळात १९७६ मध्ये ४२व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे “धर्मनिरपेक्ष” आणि “समाजवादी” हे शब्द प्रस्तावनामध्ये जोडले गेले.
तसेच संस्थेचे सचिव श्री सत्यवान सिंग दुहन यांनी सुध्धा मार्गदर्शन केले
या वेळी संविधान सन्मान रॅली सुध्दा काढण्यात आली होती.
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते आणि
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या पिपराडे हिने केले.