
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये वर्ग 12 वि कला शाखेत एकूण 64 विद्यार्थी परीक्षेला बसले असताना, त्यातील 63 विद्यार्थी कॉलेजचे पास झाले.यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी 06 , प्रथम श्रेणीत 24, द्वितीय श्रेणीत 29 तर तृतीय श्रेणीत 04 विद्यार्थी ,असे 64 पैकी 63 पास झालेत. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय मधून कु.प्रिया दामोधरराव झाडे व कु.भाग्यश्री बाबाराव मासुरकर यांना 79.33 टक्केवारी मिळून संयुक्त रित्या प्रथम क्रमांकाने तर 78.68 टक्केवारी मिळून सयुक्त्यारीत्या व्दितीय क्रमांक कु.मेघा प्रफुलराव पवार आणि पल्लवी मधुकरराव देशमुख यांनी यश प्राप्त केले. कॉलेजमधून 77.83 टक्केवारी गुण मिळवून कु.पल्लवी दामोधरराव राजूरकर हिने तिसरा क्रमांक मिळविला. 77.67 टक्केवारी गुण घेऊन कु.आचल संजयराव पानसे तर 75.26 टक्केवारी गुण घेऊन कु.पायल सुनिलराव फरकाडे यांनी प्राविण्य प्राप्त यश संपादून कॉलेज चा नावलौकिक वाढविला. या सर्व विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व संचालक सदस्य मंडळी, कॉलेज चे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
