मनसेच्या नायकानी काढली मनपा चंद्रपूर ची खरडपट्टी,शहरातील खड्ड्यांच्या चिखलाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक सचिन भोयर यांचे अभिनव आंदोलन

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर


चंद्रपूर शहर केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदले गेले आहे. महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेले पाइपलाइन टाकण्याचे काम हे पूर्णता भ्रष्ट, नियोजनशून्य ,निकृष्ट दर्जाचे असूनही मनपा पदाधिकारी व अधिकारी कोणाचेही लक्ष कंत्राटदार संतोष मुरकुटे करत असलेल्या बोगस कामाकडे नाही .नियोजनशून्य खोदकामामुळे संपूर्ण शहर खड्डेयुक्त, चिखलमय झाले आहेत. यंदा मान्सून पूर्व मुख्य रस्ते दुरुस्तीचे काम देखील मनपा प्रशासनाने काढले नाही .त्यामुळे सर्वत्र चिखल आणि वेधण्यासाठीबनलाावघेणे खड्डे पाहायला मिळत आहे. महापालिका प्रशासनाला चंद्रपूर करांना होणाऱ्या खड्ड्यांचा व चिखलाचा त्रास मनपा अधिकारी व पदाधिकारी यांना कळावा म्हणून मनसेचे नगरसेवक सचिन भोयर सभागृहात संपूर्ण शरीर चिखलाने माखून निषेध करीत निवेदन घेऊन सभागृहात दाखल झाले.सर्वसामान्य चंद्रपूरकर टॅक्स भरतो खड्ड्यात मरतो,सर्वसामान्य चंद्रपूरकर टॅक्स भरतो चिखलाने भरतो सभागृहात व महानगरपालिकेसमोर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. या आंदोलनाने सर्व नागरिकांचे लक्ष घेतले प्रशासन हादरून गेले.
केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम संतोष मुरकुटे हे कंत्राटदार करीत आहे पण काही वर्षांपासून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे .कामाची प्रगती व गुणवत्ता असमाधानकारक आहे. काम करत असताना कंत्राटदाराने शहरातील मुख्य रस्ते ,प्रभागातील मुख्य रस्ते, जोड रस्ते ,गल्ल्या सर्व ठिकाणी खोदकाम केले परंतु अंदाज पत्रकाप्रमाणे त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे संपूर्ण चंद्रपूर शहर खड्ड्यात चिखलात गेले आहे. आर्थिक लाभापोटी मनपा आयुक्त ,सत्ताधारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे पेटी कॉन्ट्रॅक्ट आणि कमिशनाणे तोंड बंद आहे. ज्याप्रमाणे मलनिस्सारण योजनेचा कंत्राटदार चंद्रपूर शहरातील रस्ते दुरुस्त न करता पडून गेला. त्याच प्रमाणे अमृत कंत्राटदार देखील पळून जाणार हे आता निश्चित आहे. शहरातील अमृत योजना ही एकमेव योजना आहे की जी पूर्ण व्हायच्या अगोदर त्याचे लोकार्पण सत्ताधार्‍यांच्या हस्ते झाले. योजना यशस्वी होणार की नाही ,चंद्रपूर करांना पाणीपुरवठा होईल की नाही, रस्ते दुरुस्त होणार की नाही याची शाश्वती नाही .अपूर्ण कामांचे लोकार्पण हा चंद्रपुरकरांवर अन्याय आहे भेदभाव आहे.
चंद्रपूर करांना होणारा खड्ड्यांचा व चिखलाचा त्रास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सभागृहात हा विषय मांडण्यात आला. त्याबाबतची तक्रार मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांनी माननीय महापौर माननीय आयुक्त यांना देत कारवाई करण्याचे मागणी केली आहे. रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली निकृष्ट कोणत्याही तांत्रिक पद्धत न वापरता सिमेंट गट्टू लावण्याचे काम सुरू आहे. या निकृष्ट कामाची तपासणी करण्यात यावी. नगरपालिका काळात करोडो रुपये खर्च करून केलेल्या मलनिस्सारण योजनेची तोडफोड अमृत कंत्राटदाराने केली आहे. याची दुरुस्ती अमृत कंत्राटदाराकडून करून घ्यावी.बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन हायड्रोलिक प्रेशर मशीन ने जोडली गेलेली नाही. कोणतेही सुरक्षेचे मापदंड वापरले गेले नाही. खोदकाम करत असताना नगरसेवकांना माहिती दिली नाही. पाईपलाईन टाकल्यानंतर सिमेंट काँक्रीट रोड सिमेंटीकरण करणे, डांबरी रस्ता डांबरीकरण करणे व WBM रोड WBM दुरुस्त करणे अनिवार्य असताना थातूरमातूर दुरुस्ती सुरू आहे .कंत्राटदाराने आतापर्यंत केलेल्या कामाची श्‍वेतपत्रिका काढून त्याची प्रत सर्व नगरसेवकांना द्यावी. कंत्राटदाराच्या कामात अनियमितता असल्यामुळे सुरक्षा ठेव जप्त करण्यात यावी. आदी मागण्यासह मनसे चंद्रपूरच्या वतीने लक्षवेधी नायक स्टाईल अभिनव आंदोलन करण्यात आले यावेळी मनवासे जिल्हा अध्यक्ष भारत गुप्ता, शहर अध्यक्ष मंदीप रोडे,जनहित जिल्हा अध्यक्ष राजू बघेले ,महिला शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकूर, मनवीसे शहर अध्यक्ष नितीन पेंदाम, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार,मनवीसे शहर उपाध्यक्ष नितेश जुमडे, अक्षय चौधरी, वाहतुक सेनेचे बळी शेळके, आसलाम शेख, जाफर बेघ,नितीन भोयर, संजय फर्डे किरण Ramedwar आदी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .