किरण कुमरे यांच्या वाढदिवसानिमित्य फळ वाटप

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आदिवासी सेवक महाराष्ट्र राज्य किरण कुमरे यांच्या वाढदिवसानिमित्य दिं ६ जुलै २०२३ रोज गुरवारला राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय राळेगांव येथे रुग्णांना तसेच संत तुकडोजी महाराज शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले आहे. यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष जानराव गिरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे,प्रकाश पोपट,भुपेंद्र चांदेकर,आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.