चहांद (परसोडा) येथे सती सोना माता पुण्यतिथी महोत्सव

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

वैराग्यमूर्ती सती सोना माता यांच्या ४२ व्या पुण्यतिथी निमित्य चहांद (परसोडा) येथे दिं १५ व १६ फेब्रुवारी २०२३ ला पुण्यतिथी मोहत्सवाचे आयोजन सती सोना माता देवस्थान ट्रस्ट व गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार दिं १५ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ६:०० वाजता घटस्थापना बाबारावजी तुर्के व शेंडे गुरुजी चहांद यांच्या शुभहस्ते होणार आहे.तर दिं १६ फेब्रुवारी २०२३ गुरुवारला सकाळी ११:०० वाजता ह.भ.प.रुपेश महाराज यांचे कीर्तन तर दुपारी १:०० वाजता उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे. या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, अँड प्रफुलभाऊ मानकर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ, राजूभाऊ तिमांडे माजी आमदार हिंगणघाट, विलास भोयर संचालक यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँक, अरविंद वाढोनकर संचालक वि.मा.के.क, चित्तरंजनदादा कोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ, वर्षाताई तेलंगे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रविंद्र शेराम नगरपंचायत नगराध्यक्ष , जानराव गिरी नगरपंचायत उपनगराध्यक्ष , प्रवीण कोकाटे माजी सभापती , प्रशांत तायडे माजी सभापती, नंदकुमार गांधी अध्यक्ष वसंत जिनिंग, मिलिंद इंगोले अध्यक्ष खरेदी विक्री संघ, तर सोनामाता देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशोकराव पाटील तसेच सोनामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिलजी धोबे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच १:३० मिनिटांनी संत एकनाथ महाराज यांच्या रंगीत संगीत भारूड चा कार्यक्रम व ह भ प गणेश महाराज शिंदे वर्धा यांचा भारुड चा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी ३:०० वाजता पासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होणार आहे तरी होण्याऱ्या किर्तन व भारुड तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सर्व भाविकभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री सती सोनामाता देवस्थान ट्रस्ट व गावकरी चहांद (परसोडा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.