
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील जंगोदाई पेनठाणा येथे आदिवासी 17 संवर्ग (PESA) अंतर्गत उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ कृतज्ञता सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक व सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. डॉ. अशोक उईके उपस्थित होते, तर आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. राजुभाऊ तोडसाम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अॅड. प्रमोद घोडाम होते. स्वागताध्यक्ष म्हणून श्री. नयन वामनराव पेंदोर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी जंगोदाई पेनठाणा ट्रस्ट, पांढरकवडा येथील मा. श्री. भाऊरावजी मरापे (अध्यक्ष), मा. श्री. रितेश परचाके (उपाध्यक्ष) व मा. श्री. काशिनाथ मेश्राम (सचिव) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त करत भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.जीवन ध.आत्राम व श्री. निकेश वि. राजगडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच इतर सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनीही मोठे सहकार्य करत कार्यक्रम यशस्वी केला.
