
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
प्रत्येक गावाची अंगणवाडी ही डिजिटल करून बालकांना दर्जेदार सोयी सुविधा आणि गुणात्मक शिक्षण देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे मात्र दुसरीकडे राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अंतरगाव येथील जिल्हा परिषद च्या मोडकळीस असलेल्या इमारतीत अंगणवाडीचा कारभार सुरू असून बालकांचा जीव धोक्यात घालून गुणात्मक शिक्षण देण्याचा कारभार सुरू आहे.
अंतरगाव जिल्हा परिषद शाळेची इमारत ही मोडकळीस आल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत होते तेव्हा गावकऱ्यांनी नवीन शाळेच्या इमारतीची मागणी केली त्यानंतर तिथे नवीन इमारत बांधकाम करण्यात आले असून येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी नवीन इमारतीत स्थानांतर झाले त्यानंतर या जुन्या मोडकळीस असलेल्या इमारतीत अंगणवाडीचा कारभार सुरू झाला मात्र मोडकळीस असलेल्या इमारतीला मोठमोठ्या भेगा पडल्या असल्याचे चित्र आहे त्यामुळे ही इमारत धोकादायक असून बालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मोडकळीस आलेल्या या इमारतीतून बालकांची भवितव्य घडविले जाते आहे तसेच इमारतीच्या बाजूला पाणीपुरवठा योजनेची टाकी असून सभोवताल दुर्गंधी पसरलेली असून या ठिकाणी मुलांना बसावे लागत आहे त्यामुळे एकीकडे डिजिटल अंगणवाडी बनविण्याची काम सुरू असले तरी दुसरीकडे मात्र अंतरगाव येथील बालकांना मोडकळीस असलेल्या इमारतीत ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यामुळे अंतरंगाव येथे नवीन अंगणवाडी केंद्राचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
अंतरगाव येथील लोकसंख्येच्या आधारावर दोन अंगणवाडी केंद्र असून या अंगणवाडी ला अद्यापही इमारत नाही आहे त्यासाठी नवीन इमारत बांधकाम आवश्यक आहे मागील दोन वर्षात कोविड मुळे शाळा अंगणवाडी बंद होत्या आता सुरू झाल्याने मोडकळीस आलेल्या इमारतीचा प्रश्न उपस्थित झाला आहे धोकादायक अवस्थेतील इमारतीमध्ये बालकांना शिक्षण घ्यावे लागत आहे प्रशासने तातडीने इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा
