रानभाजी महोत्सवाला शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद रानभाजी महोत्सवाला अधिकारी कर्मचारी झाले ग्राहक

रानभाज्यांविषयीची जनजागृती व त्याची खरेदी, विक्री व्हावी, यादृष्टीने कृषी विभागाने १४ ऑगष्ट २०२३ रोज सोमवारला प्रशासकीय इमारतीत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते.
विशेष म्हणजे तालुकास्तरीय या महोत्सवात शेतकऱ्यांची उपस्थिती न लाभल्याने अखेर हा महोत्सव शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच अनुभवला. इतकेच नव्हे त्यांनीच सर्वाधिक भाज्या खरेदी केल्या. यातूनच रानभाज्या महोत्सव कर्मचाऱ्यांसाठी भरविण्यात आला होता की काय, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.
बहुगुणी रानभाज्या केवळ पावसातच मिळत असल्याने नागरिकांना त्यांची प्रतीक्षा असते. याशिवाय आजच्या दैनंदिन जीवनातील भाज्या महाग झाल्याने त्याला पर्याय म्हणून रानभाज्या ठरत आहेत. रानभाज्याविषयी नागरिकांमध्ये अधिकाधिक जागृती व्हावे त्याचे महत्त्व कळावे, याशिवाय या भाज्याची महोत्सवाद्वारे खरेदी विक्री व्हावी, यातूनच शेतकऱ्यांसह महिला बचत गटांची आर्थिक उलाढाल व्हावी यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही तालुका कृषी विभागातर्फे तहसील च्या प्रशासकीय इमारतीचा
सभागृहात रानभाजी मोहत्सव घेण्यात आला होता या तालुकास्तरीय असणाऱ्या रानभाजी महोत्सवाचा कृषी विभागाने गाजावाजा न केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, तर इतर नागरिकही उपस्थित नव्हते. शिवाय शंभरहून अधिक तालुक्यात बचत गट असताना रानभाज्या विक्रीसाठी तालुक्यातून अवघे सात आठ महिला बचत गटाचे स्टॉल लावण्यात आले होते. मात्र, गर्दी न झाल्याने रानभाज्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न काहीसा बारगळला. विशेष म्हणजेच महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात
रानभाज्याचा महोत्सव आयोजित करण्यात आल्याने येथील असलेल्या कर्मचाऱ्यांची महोत्सव बघण्यासाठी, तर रानभाज्या खरेदीसाठी एकच गर्दी झाली होती. यातूनच हा रानभाज्या महोत्सव कर्मचाऱ्यांसाठी भरविण्यात आला, की काय अशी चर्चा सुरू होती. बहुगुणी असलेल्या रान भाज्याचे महत्त्व नव्या शासकीय कार्यालयापेक्षा एखाद्या महाविद्यालयात किंवा विभागवार घेणे अपेक्षित होते, असेही काहींचे म्हणणे आहे.