अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वरोरा च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जांभूळे सरांचा सन्मान

           

दरवर्षी ५ सप्टेंबर ला जिल्हा , राज्य व राष्ट्रीय पातळीवर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रशासनाकडून उल्लेखनीय कामगिरी करणा-या शिक्षकांना दिल्या जातो . प. स. वरोरा मधील जि. प. उ. प्रा. शाळा खेमजई येथिल संजू श्रावण जांभूळे सरांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद चंद्रपूरच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला . जांभुळे सर हे अतिशय उत्कृष्ट शिक्षक तर आहेच पण आपलं सामाजिक उत्तरदायीत्व ही ते अतिशय संवेदनशिलतेने जपतात . क्रिडा संकूल वरोरा येथे ते नियमितपणे विद्यार्थ्यांना खो – खो या खेळाचे धडे देतात . नुकतेच त्यांनी विदर्भस्तरीय खो – खो सामन्यांचे क्रिडासंकूल वरोरा येथे आयोजन केले होते . ते अखिल भारतिय प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष आहेत .
दि. १३ सप्टेबर ला सायंकाळी ७-०० वाजता अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी तथा संघसैनिकांनी जांभूळे सरांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मानचिन्ह व शाॕल देऊन सपत्नीक सन्मान केला . या वेळी नामदेव राऊत , धनराज रेवतकर , गणेश बोढे , अनिल काळे , मुकुंदा जोगी , डागाजी बुरीले , संभाजी पारोधे यांनी जांभुळे सरांच्या कार्याचा आलेख सर्वांसमोर मांडला . सगळ्यांच्या मते यावर्षीचा हा पुरस्कार एका योग्य व्यक्तीमत्वाला मिळाला आहे असे सांगण्यात आले . समारंभाला उत्तर देतांना जांभुळे सर म्हणाले की आता या पुरस्कारामुळे माझी निश्चितच जबाबदारी वाढली आहे . यापुढे या पुरस्काराला साजेशे कार्य करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले .
यावेळी मनोहर पानघाटे , प्रफुल्ल कोटावार , प्रमोद पोंगळे , संजय विरमलवार , सुरेश वाटमोडे , श्रावण टोंगे , सुनिल कार्लेकर , अरविंद मिलमिले , गजानन नवघरे , मुन्ना डेकाटे , राजू कुशमवार , अजय भगत , प्रविण निमजे , प्रविण मेश्राम , गणेश राऊत , तुकाराम उरकुडे , शरद तडस , ईश्वर टापरे , विठ्ठल वखनोर , गणपत येटे , पत्रुजी उमटे , नितीन शास्त्रकार हे संघसैनिक उपस्थित होते .
सूत्रसंचलन गोपाळ गुडधे यांनी तर आभार विजय परचाके यांनी केले .