आदिवासी गोंड गोवारी जमात वधुवर परिचय मेळावा संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्हा. चे वतीने दि. ५ जानेवारी २०२५ रोज रविवार ला जगदंबा संस्थान, केळापूर जिल्हा यवतमाळ येथे आदिवासी गोंड गोवारी जमाती मधील उपवर वधु वर मुलांचा परिचय मेळावा व जमाती मधील सेवा निवृत्त अधिकारी/कर्मचारी तसेच शासकीय नोकरीत नव्याने निवड झालेल्या तरुणांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाला जमातीचे जवळपास दोन हजार महिला पुरूषांनी उपस्थीती दर्शवीली.तर वधु वर परिचय कार्यक्रमात एकूण…. उपवर मुलामुलींची नोंदणी करण्यात आली असून सर्वांनी आपापला परिचय दिला.उपवर वधु वर नोंदणी व परिचय कार्यक्रमात तिरू. प्रविण नागोसे सर,तिरूमाय सिमा प्र.नागोसे, तिरू.संजय चचाने सर.आणि तिरुमाय सुरेखा सं.चचाने तसेच छबुताई नेवारे (घाटंजी)व रामभाऊ राऊत सर (यवतमाळ) यांनी विशेष नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.
वधुवर परिचय व सत्कार सोहळ्याचे उदघाटक म्हणून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तिरू.मनोहर शहारे(अध्यक्ष ‘एल्गार’,महाराष्ट्र)तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तिरु.सचिन चचाने आणि मार्गदर्शक म्हणून तिरू.रामदास नेवारे(राज्य सदस्य सचिव, आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र, महाराष्ट्र) हे उपस्थीत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून तिरू. किशोर चौधरी,चंदन कोहरे(दोन्ही आमरण उपोषणकर्ते) तर प्रमुख उपस्थीती म्हणून तिरू.हरिभाऊ सहारे (सेनि.स्टेट बॅंक मॅनेजर,यवतमाळ) ,तिरू.गणेश राऊत, सेनि.तहसीलदार पा.कवडा,जनाजी लोहट से.नि.पोलीस निरीक्षक (बेला तेलंगणा),गजानन कोहळे,विलास राऊत,प्रा.पत्रूजी नागोसे,केशव सोनवणे,शंकर नेवारे चंद्रपूर, तिरू. प्रभाकर नेवारे,घनशाम गजबे,देवचंद नागोसे, गोपाल ठाकरे ,पद्माकर राऊत(गोंदिया), अनिल राऊत,आशिश नेवारे,हेमंत राऊत (नागपूर),भानुदास कोयरे,गजानन दुधकोहळे, दिगांबर दुधकोहळे,इंजि.मनोज मुरखे,(यवतमाळ), नंदकिशोर नेहारे(चालबर्डी,)काशिनाथ वाघाडे सर(घाटंजी) देवराव वाघाडे सर,श्रीराम गजबे सर,शालीक मुरखे सर(आर्णी),तिरुमाय मंदाताई नेवारे,(पां.कवडा)तिरू.संजय चचाने,तिरूमाय सुरेखा चचाने(मारेगांव), अभिजीत मुरखे उपसरपंच, निलेश ठाकरे, संतोष चौधरी, तुकाराम नेहारे, देविदास सोनवणे सर,दादाराव नागोसे,मिलिंद राऊत(पां.कवडा) हे उपस्थीत होते.
कार्यक्रमादरम्यान उदघाटनीय भाषणात इंजि.मनोहर शहारे यांनी वर्तमान काळात जमाती मध्ये उपवर मुला मुलींचे परीचय मेळावे आयोजीत करून त्यातून लग्न संबंध घडवून आणने याबाबतचे महत्त्व विशद करून गोंड गोवारी जमाती बाबत मा.सुप्रीम कोर्टाने दि.१८/१२/२०२० ला दिलेल्या निकाला नंतर या निकालातील संदर्भाप्रमाणे संविधानिक गोंड गोवारी जमाती चा दावा करून आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती,महाराष्ट्र चे वतीने जमातीने केलेल्या रस्त्यावरील व न्यायालयीन लढ्याबाबत मार्गदर्शन केले.तर संघर्ष कृती समिती,महाराष्ट्र चे राज्य सदस्य सचिव तिरू.रामदास नेवारे,आमरण उपोषणकर्ते किशोर चौधरी, सचीन चचाने यांनी आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती,महाराष्ट्र ने उभारलेले रसत्यावरील व न्यायालयीन लढे कृती समिती च्या अभ्यास गटा कडून अभ्यासलेल्या लागु घटनात्मक मुद्याचे आधारावर लढली जात आहे.याबाबत सविस्तर माहिती दिली आणि जोपर्यंत शासनाकडून आपल्या संविधानिक मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील असे जाहीर केले.कार्यक्रमाचे संचलन तिरू.प्रा.पत्रू नागोसे,प्रविण नागोसे,सुनील चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजि.मनोज मुरखे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी, बंडू उर्फ राम वाघाडे,समीर शेंद्रे,प्रविण नागोसे सर, हरिदास मुखरे,अमीत नेवारे,आकाश ठाकरे, निलेश भोयर,प्रविण राऊत, विलास वाघाडे, श्रीकांत नेवारे, सौरभ मंडलवार,पुंडलिक फुन्ने, पुरुषोत्तम राऊत, दिपक राऊत, गजानन नेहारे, गणेश शेंद्रे, राहुल दुधकोर, सत्यजित नेवारे, विनोद कोहळे, प्रविण गजबे, अशोक भोयर,स्वप्नील ठाकरे, संदेश भोयर, पवन नेहारे, अंकुश ठाकरे, अनिकेत मुरखे, गजु दुधकोहळे, सचिन अंबाडारे, जगदीश नेवारे, कविता मुखरे,दत्ता नेवारे, सुधाकर नेहारे, संदीप शेंद्रे, विशाल मुखरे(कवठा), संतोष राऊत(पिवरडोल), आरती ना.राऊत (चालबर्डी),प्रशांत लसंते,राजकुमार दुधकोहळे, प्रकाश वाघाडे,विकेश नागोसे, निलेश राऊत, मंगेश चौधरी, विजय नेहारे यांनी विशेष परीश्रम घेतले.