
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सातारा येथील उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणा नंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई त्वरीत करण्यात यावी, अशी ठाम मागणी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पोलिस अधिकारी व इतरांवर केलेले गंभीर आरोप उघडकीस आल्यानंतर राज्यातील डॉक्टर समाजात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून झालेल्या लज्यास्पद प्रकरणाचा निषेध करत आंदोलन केले. यावेळी झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी व अशा घटना घडू नये यावर प्रतिबंध लावावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर वैद्यकीय अधिकारी संपावर जातील असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात वैद्यकीय अधिकारी संघटना ,मार्ड संघटना, आंतरवासीता डॉक्टर संघटना सहभागी झाल्या.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद कुळमेथे, कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर्स डॉ. अक्षय संजय सोनुने, डॉ. दानिश हुसैन दोसाणी आणि डॉ. मयूर कैलास इंगळे, मार्ड चे अध्यक्ष डॉ.शुभम देशमुख, डॉ. प्रियांका बाजोरिया तसेच आंतरवासिता डॉक्टर्स डॉ. अवंती फटिंग, डॉ अवीष्का फुसे, डॉ हर्ष गजभिये, डॉ साक्षी झूनझूनवाला, डॉ प्राची कराडे, डॉ वेदांती दापूरकर, डॉ सौरभ घुमडे, डॉ सुमेध जगदाळे, डॉ तिलक गुप्ता, डॉ सार्थक भोले, डॉ सुरज जाधव, डॉ सौरभ खटाल, डॉ किरण साकुले, डॉ नंदिनी मेश्राम, डॉ प्रद्यूमन इंचिलवार, डॉ अभिनव गुप्ता, डॉ अमन पुनिया, डॉ दक्षिता गाडे, डॉ रजनींदिनी शिंदे, डॉ अतुल शुक्ला तसेच डॉ यशवंत बोकडे, डॉ वैभव बागल, डॉ विद्यासागर गेडाम, डॉ अंकिता हालदार, डॉ तनया शेंडे, डॉ सचिन जाधव, डॉ यामिनी वरथे, आदीं डॉक्टर्स सहभागी होते.
