
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड /-
शहरासह तालुक्यात आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाला तेव्हा सिबदरा येथील शेत शिवारात सोयाबीन काढणी साठी गेलेल्या दोन शेतकऱ्यावर वीज कोसळली त्यात वारगटाकळी येथील मयत शेतकरी सुनील साहेबराव वायकोळे वय 34 हा सोयाबीन काढणीसाठी सिबदरा येथे गेले असता अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसात शेतातील सोयाबीन वर फारी झाकण्यासाठी धावपळ करत असलेल्या दोन शेतकऱ्यावर अचानक वीज कोसळून त्यात एक जण जागीच मृत्यू झाला तर दुसरा गजानन टोकलवाड हा गंभीर जखमी झाला असल्याचे घटना स्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर वरून राजाने पाऊसाची हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे पहायला मिळत आहे अती त्यात गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागात जोर दार पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी जरा जरी उघड पडली तर आपल्या शेतात जाऊन आपल्या कुटुंबाची दिवाळी चागली होईल ह्या विवंनचनेने आपल्या शेतात सोयाबीन काढणीसाठी लग बग करत असल्याचे सध्या पहायला मिळत होता त्यातच शेतात काम करत असताना अचानक मेघ गर्जना होऊन जोरदार पाऊस सुरू झाल्याचे पाहून वारगटाकळी येथील शेतकरी सि ब दरा परीसरातील शेतकऱ्याच्या शेतात हारवेस्टरने सोयाबीन काढणीची लगबग करीत असताना सोयाबीन वर फारी झाकण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यावर दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अचानक वीज कोसळून त्यात सुनील साहेबराव वायकोळे वय 34 हा शेतकरी मरण पावला आहे तर गजानन टोकलवाड हा गंभीर जखमी झाला असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले त्यामुळे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ शासनाची आर्थिक मदत निर्माण करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे,
