गणपती उत्सव व पोळा हे सण शासनाच्या चौकटित राहून साजरे करा :- अप्पर पोलीस अधीक्षक कबाडे , शांतता कमिटीची बैठक संपन्न..


तालुक्यासह संपूर्ण ग्रामीण भागात काही दिवसातच पोळा व गणपती उत्सव सणाचे आगमन होणार असून त्यानिमित्त दि 2 सप्टेंबर रोजी शहरातील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे साहेब यांनी एक शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती त्यावेळी उपस्थित गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधीक्षक कबाडे साहेब यांनी असे सांगितले की सर्वांनी गणेश उत्सव व पोळा हे सण एकदम शासनाच्या चौकटित राहून एकदम साध्या पद्धतीने साजरे करा व हिमायतनगर पोलीस प्रशासनास सहकार्य करा असे आव्हान यावेळी केले सध्या संपूर्ण देशात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व सण उत्सव बंद होते त्यामुळे आपण आज दि 2 सप्टेंबर रोजी हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये पोळा व गणेश उत्सव या पार्श्वभूमीवर एक शांतता कमिटीची एक बैठक आयोजित केली होती यावेळी या बैठकीस शहरातील सर्व गणेश मंडळाच्या सदस्यांची व शांतता कमिटीच्या सदस्यांनी उपस्थिती लावून आपले म्हणणे व उपायोजना पोलीस प्रशासनास सांगितल्या त्यानंतर प्रशासना तर्फे यावर काय काय उपाय योजना कराव्या लागतील ह्याचे निर्देश उपस्थित विभागांना अप्पर पोलीस अधीक्षक कबाडे साहेब त्यांनी दिले त्याच बरोबर यावर्षी बैलपोळा व गणेश उत्सव हे आपण सर्वांनी घरगुती सण महणुन एकदम साध्या पद्धतीत साजरे करावे अशी विनंती व सूचना पोलीस प्रशासनाने उपस्थित मंडळास दिल्या व सार्वजनिक गणेश मंडळांनी 4 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्ती स्थापन करू नये व सार्वजनिक ठिकाणी कोणताही गाजावाजा करू नये असे यावेळी सांगितले व उपस्थित शेतकऱ्यांचा मानाचा समजला जाणारा सण बैलपोळा हाही प्रत्येक शेतकऱ्यांनी आप आपल्या घरगुती सना प्रमाणे साजरा करावा अशी सर्व शेतकऱ्यांना यावेळी विनंती केली
यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, नायब तहसीलदार तामसकर साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन साहेब, पोलीस उप निरीक्षक देवकते,नगर पंचायत चे रत्नाकर डावरे ,महावितरण कंपनीचे अभियंता भडांगे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफीक सेठ,अशरफ खान पठाण,माजी तंटा मुक्ती अध्यक्ष अनवर खान पठाण, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपा अधायक्ष फेरोज खान,शिवसेना उप तालुका प्रमुख विलास वानखेडे, लोहरेकर पाटील,माजी नगरसेविका सौ. पंचफुला बाई लोणे,बजरंग दल तालुका अध्यक्ष गजानन चायल,प्रवीण कोमावार सह सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पत्रकार,ज्येष्ठ नागरिक व व्यापारी यावेळी उपस्थित होते