बालीका दिना निमित्त रामचंद्र गुंजकर यांचा प्रबोधनपर कार्यक्रम


ढाणकी प्रतिनिधी(प्रवीण जोशी)


कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयात जागतीक बालिका दिना निमित्त प्रबोधनकार रामचंद्र गुंजकर यांचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य श्रीमती एस.बी.शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक प्रा.दिपक वाघमारे ,भावराव सुर्यवंशी ,प्रा.यु.डी.गवई,पी.ए.वासे,ए.व्ही.नलेवाड,इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.
यावेळे प्रबोधनकार गुंजकर यांनी बालिका दिनाचे महत्व विशद करून मुलींना सर्व अंधश्रध्दा पासून मुक्त होण्यासाठी व शिक्षणाची कास धरण्याचा आग्रह केला.छत्रपती शीवाजी महाराज यांनी तानाजी मालुसरेला तोरणागड सर करण्यासाठी सुचविले असता त्यांनी स्वतःच्या मुलाचे लग्न लांबवले परंतु शीवाजी महाराजांनी सांगीतलेले कार्य आधी तडीस नेले यावरूण त्यांची निष्ठा व आपल्या कर्तव्याची जान कशी ठेवावी याचे ज्वलंत उदाहरण यांनी सांगीतले.एक मुलगी म्हण्ूान आपण शीक्षण घेत असतांना गुरूजनांचा कधही कोणत्याही प्रकारचा अवमान करू नका असेआवाहन त्यांनी केले.विद्यार्थीनींना प्रस्न विचारून त्यांनी तुमच्या जिवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे. याची उत्तरे काढून घेतली मुलींनी सुध्दा यावेळी अतिषय छान उत्तरे दिली.
ग्ुांजकर यांच्या अगोदर राहूल चंद्रे यानी प्रास्ताविकातून जागतीक बालीका दिनाचे महत्व समजावून सांगीतले तर अध्यक्ष पदावरूण बोलतांना प्राचार्य शिंदे यांनी थोर व्यक्तींच्या चरीत्रावरून आपल्याला असे दिसून येते की,सर्वांनी मुलींच्या शीक्षणासाठी अतोनात कष्ट घेतले.सावित्राबाई फुले चा वारसा असलेल्या महाराष्ट्रात मुलींनी शीक्षणाकडे लक्ष देवून ताठ मानेने जगले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए.ए.आलोने यांनी तर आभार संदिप मडके यांनी मानले.