माढेळी येथे आचार्य ना.गो.थुटे पुरस्कार प्रदान सोहळा तथा निमंत्रितांचे कविसंमेलन


सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर शाखा वरोरा तर्फे दि.५ मार्चला रोज रविवारी सकाळी १०:३० वाजता शेतकरी भवन माढेळी येथे आचार्य ना.गो.थुटे साहित्य पुरस्कार चंद्रपूर येथील कवयित्री सौ.नीताताई कोंतमवार यांना युवानेते करण देवतळे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध कवयित्री डॉ.पद्मरेखा धनकर यांच्या अध्यक्षतेखाली , ज्येष्ठ साहित्यिक ना.गो.थुटे,प्रकाश मुथ्था,रमेश राजूरकर,देवानंद महाजन, रोहिणीताई देवतळे,संजय महाजन,आशिष रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केला जाईल.तसेच निमंत्रितांचे कविसंमेलन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधीर मोते यांच्या अध्यक्षतेखाली, धनंजय साळवे,प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्वांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सूर्यांश साहित्य संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख, वरोरा शाखाध्यक्ष निलेश देवतळे,सचिव भारती लखमापूरे, सुभाष उसेवार,दीपक शिव,विजय भसारकर, जीतेश कायरकर,राजू लखमापूरे, ज्योती मोहितकर,शिरिष दडमल, आरती रोडे यांनी केले आहे.