
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन, तूर आदींची पेरणी झाल्याने शेतकरी कपाशी व इतर पिकांसाठी खत देण्याचे नियोजन करीत असताना खत लिंकिंग व्यवस्थेअभावी शेतकरी संभ्रमात असल्याने या लिंकिंग मुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे. अशा मुजोर कंपनीवर कार्यवाही करण्याची मागणी यवतमाळ जिल्हा भाजपा अध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
शेतकरी मिश्र खते व नत्राची मात्रा अधिक असलेल्या युरिया खताची खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात गेल्या नंतर मात्र, जे खत शेतकरी वापरतच नाही, असेही खत काही विशिष्ट खताची मागणी केल्यानंतर त्यासोबत लिंकिंगच्या नावावर इतरही खत दिले जात लिकिंगमध्ये आलेले खतही शेतकऱ्यांना खरेदी करण्यास भागपाडले जात आहे. अशी ओरड शेतकऱ्याची आहे. मागील काही वर्षांपासून कंपनीचा लिंकिंगच्या व्यवसाय फोफावला असून डी एपी, युरिया या सोबत कृषी केंद्र चालकांना जबरदस्तीने सोबत नॅनो डीएपी, नॅनो युरिया, पी डी एम पोटॅश सल्फर शेतकऱ्याना न चालणारे खत ५० हजार रुपयाचे लिंकिंग घेण्यास भाग पाडत आहे. त्यामुळे या लिंकिंगमुळे नाईलाजास्तव कृषी संचालकांना शेतकऱ्यांना द्यावे लागत असल्याचे कृषी व्यवसायीकांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकरी व कृषी संचालक दोघांसह या लिंकिंगचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा मस्तवाल व मुजोर तथा शेतकरी विरोधी कंपन्यांवर तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी अॅड. प्रफुल्ल चौहान यांनी केली आहे.
