
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
आज दि.01/04/2023 रोजी सांस्कृतीक,मत्स व वनमंञी मा.ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार हे उमरखेड येथे लोकार्पण सोहळ्यानिमित्त आले असता, यांना यवतमाळ जिल्ह्यातील 750 सामुहिक वनहक्क प्राप्त गावांचे सीमांकन करण्यासाठी वनविभागांला आदेश देण्याकरिता विनंतीपुर्वक निवेदन देण्यात आले व या कामासंबंधी येणार्याअडचणी संदर्भात चर्चा केली असता, मा.मंञी महोदयानी ,”या संबंधी काहिही अडचणी असल्यास मला कळवा मी तुम्हाला मदत करीन”! असे आश्वासन देऊन निवेदन स्विकारले.
यावेळी,या विभागाचे खासदार हेमंतभाऊ पाटील, उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाणे साहेब ,उमरखेड वनविभागाचे वनपरीक्षेञ अधिकारी पांडे साहेब,ढाणकी नगर पंचायतचे मा.नगराध्यक्ष जयस्वाल, साहेब,फिल्ड ट्रेनर शेवंतराव गायकवाड, सामुहीक वनहक्क व्यवस्थापन समीतीचे सदस्य आदी हजर होते.उ
