
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गुरुपौर्णिमा गुरू शिष्य यांचे परंपरा, संस्कृती जपणारे नातं दरवर्षी प्रमाणे या वर्षी महतपुरी महाराज यांच्या मठात वृक्षारोपण करून, भजन भक्ती भावाने कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात निरंजन माहुर येथील ग्राम गिता प्रवचनकार प.पु.मोकासे महाराज यांच्या उपस्थितीत मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे उपस्थित होते. आनंद सांप्रदाय भक्ती गीते म्हणून मनिराम शाहगड आणि दिलीप मेश्राम यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने मठामध्ये गुरुशिष्य भक्ती भाव दिसुन येत होता.मा.मधुसुदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी दहा फळझाडे लावून वृक्षारोपण करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या गुरुपौर्णिमा कार्यक्रमांत प्रामुख्याने सहभागी मा मधुसूदन कोवे, गुरुजी प.पु मोकाशे महाराज मा एकनाथ राऊत अध्यक्ष विश्वकर्मा गृप राळेगाव मा प्रल्हाद काळे यवतमाळ, संजय हामंद आष्टा मनिराम शहागड यवतमाळ, अशोकराव मंगाम श्रीरामपूर सौ सुशिला सलामे सौ पार्बता मंगाम रामकृष्ण सलामे कीशोर आडे दिलीप मेश्राम देवा मडावी आणि बरीच गावकरी ग्रामस्थ सहभागी झाले होते*
