दिलीप भोयर सुखरूप परत आल्याने सर्व गोरगरिबांनी मिठाई वाटप करून साजरा केला आनंदोत्सव

वणी :- येथील श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष सुखरूप घरी परतल्याच्या आनंदाने त्यांचे गाव येथील सर्व गोरंगरिब निराधार लोकांनी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.दिलीप भोयर यांच्या उपजीविकेचे साधन असलेले त्यांचे वणी येथील पंचायत समिती सभागृहजवळील झेराक्स सेंटर व त्यातच गोरगरिबांच्या मदतीसाठी उभारलेल शेतकरी तक्रार निवारण व मार्गदर्शन केंद्र अतिक्रमनाच्या नावाखाली कोणतीही पूर्व सूचना न देता बळजबरीने काढण्यात आल्याने ते व्यथित होऊन गेले होते. ते पंढरपूर वरून वणीला येत असताना हा सर्व प्रकार घडला व त्यांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याने ते वणीला येण्या अगोदरच नांदेड वरून ते बेपत्ता झाले होते. त्यामुळे संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात एकच चर्चेला उद्यान आले होते. त्यांचा जीव सुखरूप रहावा या करिता सर्व गोरगरीब निराधार लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करायला लागले होते. त्यांच्या सुखरूपतेची सर्वांना काळजी वाटायला लागली होती.कारण तालुक्यातील हजारो गोरगरिबांना एकत्रित करून त्यांना शासनाच्या निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याचे कार्य त्यांनी सुरू केले होते. व ते सातत्याने करीत आहे. त्यांच्या या लोककल्याणाच्या कार्याने सर्वच राजकीय पक्ष हादरून गेले आहे. व राजकीय दबावापोटी त्याचे उपजीविकेचे साधन बंद केल्याची चर्चा सर्वत्र रंगत असली तरी त्यांना सुखरूप बघून गोरगरिबांच्या मुखावर मात्र आनंद दिसून येत आहे. बेपत्ता झालेले गरिबांचे कैवारी दिलीप भोयर हे गुरुकुंज मोझरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीवर आढळून आले व त्यांना गुरुकुल चे संचालक रवी मानव यांनी घरी सुखरूप पोहचवले. ते घरी पोहचल्या नंतर अनेकांनी त्यांच्या भेटी घेतल्या व प्रथमतः ते आपल्या गावी नेरड येथे गेले असता गावातील सर्व गोरंगरिबांनी त्यांची स्वागत केले व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी अतुल पिदूरकर, प्यारेलाल मेश्राम , राजू जुनगरी, अंकीत पिदूरकर, महादेव कोंकमवार, चंदू पारखी यांच्यासह असंख नागरिक उपस्थित होते.

गावकऱ्याची भावनिक साद

आम्हला वाऱ्यावर सोडून जाऊ नका तुमच्या शिवाय आमचं आहे तरी कोण तुम्ही आहे म्हणून आज आम्हाला जगण्याचा आधार मिळाला आता यापुढे तुम्ही अस काही करू नका आम्हला सांगा आम्ही जे मदत करता येईल ती करू अशी भावनिक साद गावकऱ्यांनी दिलीप भोयर यांना घातली यावेळी त्यांच्या पत्नी सौ. सुकेशनी भोयर या देखील उपस्थित होत्या.