श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगावचा क्षेत्रीय भेटीचा दौरा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची क्षेत्रीय भेट दौरा दिनांक 8/12/2022 रोज गुरूवारला जवळपास 125 विद्यार्थी घेऊन निघाला.त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा येथे जाऊन तेथील अतिशय महत्वाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.सोबतच जंगलसफारीच्या माध्यमातून त्या परिसराचे भ्रमण करण्यात आले.त्यावेळी राजकुमार नावाचा वाघ, दोन बिबट,अस्वल, काळवीट, पांढरे हरीण,काळे हरीण यांचे दर्शन झाले.त्यावेळी त्याबाबत शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन केले.तेथील दौरा पूर्ण झाल्यानंतर नागपूर येथील रमन विज्ञान केंद्राला भेट येऊन तेथील विज्ञान उपयोगी साहित्यांची माहिती दिली.सोबतच प्रत्यक्ष तेथील स्थळ पाहून आनंद घेतला.सोबतच विद्यार्थ्यांना उर्वरित मार्गदर्शन केले.त्या क्षेत्राची भेट आटोपल्यानंतर रामनगर तलाव खिंडसी येथे भेट देऊन त्या स्थळाची माहिती देण्यात आली.सोबतच इच्छुक विद्यार्थ्यांनी बोटींग करून आनंद घेतला.सोबतच सखोल अशी माहिती सुद्धा शिक्षकांनी दिली.त्यावेळी त्यांच्या सोबत विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड तसेच शिक्षक रमेश टेंभेकर,श्रावनसिंग वडते,दिगांबर बातुलवार, रंजय चौधरी, राजेश भोयर सौ.वंदना वाढोणकर, वैशाली सातारकर,शुभम मेश्राम,पवन गिरी, अश्विनी तिजारे,रूचिता रोहणकर सह शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.